शिकलगार सहकारी पतपेढीमध्ये गुंतवणूक करा
शिकलगार सहकारी पतपेढीने नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी राखली असून भागधारकांना (शेअरहोल्डर्सना) लाभांश (डिव्हिडंड) देण्याची पतसंस्थेची वचनबद्धता राखली आहे. या परंपरचा संस्थेला अभिमान आहे. अनेक वर्षांपासून, पतपेढीने शेअर भांडवलावर वार्षिक 8% दराने सातत्याने लाभांश दिला आहे. यातून संस्थेची आर्थिक स्थिरता दिसून येते. या सातत्याने दिल्या जाणाऱ्या लाभांशा द्वारे पतपेढीचे सुजाण व्यवस्थापन, मजबूत आर्थिक पाया आणि सभासदांच्या हितासाठी असलेली निष्ठा दर्शवते.
जास्तीत जास्त लोकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने शेअर्स मधील किमान गुंतवणूक ₹100 निश्चित करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींनाही यामध्ये सहभागी होता येईल. त्याचबरोबर जबाबदार गुंतवणूक आणि दीर्घकालीन वचनबद्धता सुनिश्चित करण्यासाठी, जास्तीत जास्त शेअरहोल्डिंगची मर्यादा ₹5,00,000 ठेवण्यात आली आहे. कृपया लक्षात घ्या की हे शेअर्स हस्तांतरणीय नाहीत. ज्यामुळे सहकारी भावना आणि आपल्या मूल्यवान भागधारकां मधील परस्पर विश्वास अधिक दृढ होतो.
शिकलगार सहकारी पतपेढीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने केवळ आकर्षक आर्थिक परतावा मिळतो. एवढेच नाही तर एका विश्वसनीय आणि समुदाय-आधारित बँकिंग संस्थेचा भाग होण्याची संधी देखील मिळते.