ग्राहकांचा वाढदिवस आमच्यासाठी खास!
वाढदिवस खूप खास असतात आणि प्रत्येकाला त्या दिवशी शुभेच्छा मिळाल्यावर आनंद होतो. आपल्याला त्या दिवशी आठवले जाते हे जाणून व्यक्तीला आनंद आणि समाधान वाटते. आमच्या ग्राहकांना विशेष आणि आनंदी वाटावे यासाठी 2024 मध्ये आमच्या अध्यक्षांनी हा उपक्रम सुरू केला. यामुळे ग्राहकांची निष्ठा आणि पतपेढीशी असलेले नाते अधिक मजबूत होते. प्रत्येक महिन्यात काही ग्राहकांचे वाढदिवस असतात. त्या विशिष्ट दिवशी आमच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरीचे बर्थडे कार्ड आणि सुंदर गुलाब पुष्प ग्राहकाला दिले जाते. प्रत्येक महिन्याच्या शेवटी, त्या महिन्यात वाढदिवस असलेल्या सर्व ग्राहकांना शाखेत बोलावले जाते आणि त्यांच्या हस्ते केक कापला जातो. त्यांचे फोटो काढले जातात आणि ग्राहक या उपक्रमाचे खूप कौतुक करतात. अनेक छान प्रसंग आहेत. ज्या ग्राहकांचा वाढदिवस आहे, त्या दिवशी आमचे प्रतिनिधी ग्राहकाला वैयक्तिक रित्या भेटले. यावेळी “माझा वाढदिवस आहे हे मी स्वतःच विसरलो होतो, अशा अनेक ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत. म्हणूनच ग्राहकांशी आमचे अतूट नाते तयार झाले आहे, असे आम्ही खात्रीने सांगू शकतो.