सहलीचे आयोजन
एखाद्या ठिकाणी सहल किंवा पिकनिक हा ताण कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पिकनिक लोकांना एकत्र आणते आणि त्यांच्यात आपुलकीची भावना वाढवते. लोक आपले अनुभव शेअर करतात आणि आठवणी जपल्या जातात. अशाच प्रकारची एक भन्नाट सहल शिकलगार पतपेढी ने कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि सर्व संचालकांसाठी आयोजित केली होती.
विरार मधील HD रिसॉर्ट मध्ये एका रात्रीच्या मुक्कामाची ही पिकनिक होती. 2 ऑगस्ट 2024 रोजी दुपारच्या सुमारास सर्व उत्साही कर्मचारी, संचालक, त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत विरारला निघाले आणि दुपारी 3 वाजे पर्यंत विरार स्टेशनवर भेटले. तिथून रिसॉर्ट पर्यंत जाण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. हे रिसॉर्ट प्रशस्त होते आणि त्यात मोठा पूल, खेळण्याची जागा, सुंदर बाग आणि सुसज्ज क्लब अशा चांगल्या सुविधा होत्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पूल, भरभरून नाश्ता आणि जेवणाचा आनंद घेतला. उत्कृष्ट साऊंड सिस्टीमने पिकनिकला चार चाँद लावले.
सर्वांनी एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. भरपूर धमाल आणि खेळा सोबतच सर्वांनी आपले विचार आणि अनुभव एकमेकां सोबत शेअर केले. यामुळे त्यांच्या स्वभावाची एक नवी आणि चांगली बाजू दिसली. कधी आम्ही सर्वजण हसलो, तसेच काही अनुभव सांगताना भावनांनी भारावून गेलो. त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. पिकनिकच्या शेवटी कोणालाही तिथून जायची इच्छा नव्हती. कारण सर्वांमध्ये एक मजबूत आपुलकीचे नाते तयार झाले होते, सहलीतून हेच उद्दिष्ट साधायचे होते.