कर्ज मेळावे
विद्यमान आणि नवीन कर्जदारां मध्ये पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि आमच्या योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कर्ज मेळावे आयोजित केले जातात. या कर्ज मेळाव्या च्याच दिवशी, जर एखाद्या व्यक्तीने RD किंवा FD उघडली, तर त्यांना १% अतिरिक्त व्याजदर दिला जातो. तसेच त्या दिवशी वितरित केलेल्या कर्जावर 1% कमी व्याजदर आकारला जातो.
याच धर्तीवर, 28 आणि 29 जून 2024 रोजी आमच्या गोरेगाव शाखेत कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिथे 55 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. त्याचप्रमाणे, 11, 12 आणि 13 ऑगस्ट 2023 रोजी कुर्ला शाखेत 3 दिवसांचा कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये अंदाजे 1 कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले.