Core Banking Cover Image

कोअर बँकिंग

कोणतंही ठिकाण, कोणतीही वेळ..बँकिंग तुमच्या हाती!


सध्या डिजिटल जग प्रचंड वेगाने बदलत आहे. त्यामुळे नव तंत्रज्ञान हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या संवाद साधण्याच्या, व्यवहाराच्या, सेवा घेण्याच्या सगळ्याच पद्धती आता बदलल्या आहेत. या आधुनिक प्रगती सोबत राहण्याचं आणि ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याचं महत्त्व ओळखून, शिकलगार सहकारी पतपेढीने डिजिटल नूतनाविष्कार स्वीकारला आहे. आणि सर्व शाखांमध्ये कोअर बँकिंग सेवा (CBS) लागू केली आहे.

हे पुढचे पाऊल उचलत आता 'एनी ब्रांच बँकिंग' (Any Branch Banking) सुविधा देत आहोत. म्हणजेच ग्राहकांनी आपलं खातं कोणत्याही शाखेत उघडलं असलं तरी, ते आमच्या कोणत्याही शाखेतून त्यांचे बँकिंग व्यवहार करू शकतात. या सुविधेतून ग्राहकांना अधिक लवचिक, सोयीस्कर रितीने खात्यात रिअल-टाइम मध्ये बँकिंग लेनदेन करता येईल. यामुळे पारंपरिक, विशिष्ट शाखेत जाऊनच व्यवहार करावा, अशा मर्यादा आता राहिलेल्या नाहीत.

तंत्रज्ञानावर आधारीत अशी आमची सेवा असल्याने पतसंस्थेतील प्रक्रिया अधिक जलद, सुरक्षित असते. यातून उत्तम कार्यक्षमता देखील साधली जाते. ग्राहकांचा एकूणच बँकिंग अनुभव उत्कृष्ट करणे हाच यामागील हेतू आहे. ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी शिकलगार सहकारी पतपेढी नावीन्यपूर्ण बँकिंग सुविधा देण्यासाठी प्रतिबध्द आहे.


Retail Banking Cover Image

रिटेल बँकिंग

शिकलगार को-ऑप क्रेडिट सोसायटीने 10 वर्षांपूर्वी वैयक्तिक आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने रिटेल बँकिंगमध्ये प्रवेश केला आणि सोन्यावर तारण कर्ज (गोल्ड मॉर्गेज लोन) देण्यास सुरुवात केली.

संस्थेच्या प्रमुख योजनांमध्ये पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांसाठी वैयक्तिक कर्ज (इंडिव्हिज्युअल लोन्स) उपलब्ध आहेत. बँकेने नुकतीच नवीन कर्ज योजना, 'गोल्ड परचेस मॉर्गेज लोन' (सोने खरेदी तारण कर्ज) सुरू केली आहे.